सूयोग्य विचार आणि योग्य कृतीचे सामर्थ्य

 सूयोग्य विचार आणि योग्य कृतीचे सामर्थ्य



मित्रांनो ,

बहुतेक वेळा शारीरिक आजारांना आपण आपल्या मानसिक आजारांपेक्षा जास्त प्राथमिकता देतो. शारिरीक आजार आणि मानसिक आजार यांतील मुख्य फरक म्हणजे शारिरीक आजाराच्या उत्पत्तीची काही वैशिष्ट्ये आहेत जी शारीरिक आजारांना शोधण्यायोग्य बनवतात. दुसरीकडे  मानसिक आजार, शारीरिक आजाराच्या तुलनेत कधी कधी गंभीर असला तरी , सहज शोधता येत नाही. आपल्या सामाजिक संरचनेमुळे मानसिक व्याधीबद्दल उघडपणे बोलणे महत्वाचे मानले जात नाही किंवा आजही दुर्लक्षित केले जाते. तसेच मानसिक आजारांबरोबर "सायको" हा शब्द जोडला गेला आहे. त्यामुळे सहसा लोक मानसिक ताण, दडपण, भिती, तसेच मानसिक व्याधी याबद्दल बोलणे टाळतात किंवा त्याबद्दल उघडपणे बोलणे लाजीरवाणे समजतात. 

खरे तर मानसिक व्याधीबद्दल बोलणे , आपली समस्या आपल्या समुपदेशकाकडे मांडणे हे अजिबात लाजीरवाणे नसुन खरं तर मी म्हणेन की ही एक शौर्याची कृती आहे आणि आपल्याला मदतीचा हात हवा आहे हे ओळखण्यासाठी प्रचंड आत्मबलाची आवश्यकता आहे. 

निरोगी आयुष्य जगन्यासाठी आपल्या मानसिक आरोग्या बद्दल जागृत असने गरजेच आहे.

           आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतः व आपले स्वतःचे आयुष्य आहे आणि आयुष्य हे हातातून निसटून जाऊ देण्यासाठी नव्हे तर त्यात आपली उत्तरोत्तर प्रगती साधण्यासाठी आहे.

आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. स्वतःबरोबर झगडणे , सतत स्वतःला कमी लेखणे बंद करा.
तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारने आणि आपल्याबद्दल प्रत्येक गोष्टीचा थेट स्वीकार करने ही स्वत:ला ओळखण्याची सुरुवात आहे.

तुम्ही स्वतः तुमची सर्वात विश्वसनीय शक्ती आहात. चांगले/वाईट/महान/दु:खी आपल्यातील बहुसंख्य लोक स्वत:च्या प्रयत्नाने बनतात. थोडक्यात चांगले बनण्यासाठी, वाईट बनण्यासाठी, महान बनण्यासाठी, दु:खी बनन्यासाठी, प्रामुख्याने आपण स्वतःच जबाबदार असतो.

आपल्या आजुबाजुच्या नकारात्मक गोष्टींचे आणि नकारात्मक लोकांचे महत्व कमी केल्यास तुम्हाला समजेल की जगाची तुमच्यावर किंवा तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याची खरंतर शुन्य कुवत आहे. 

नेहमी लक्षात ठेवा, आपल्या सर्वाचा एकमेव प्रवास आहे जो आंतरिक आहे.


आपलाच, 
रूपेश रा शुक्ल


टिप : मित्रांनो मी असे मानतो की आपली "स्वतःची" मते नेहमी इतरांच्या मतांनी प्रेरित असतात. माझा विश्वास आहे की, ज्या वेळेस मी लिहितो ते लिखाण केवळ माझे नसुन त्यावर वाचनात आलेले लेख, माझ्या गुरूंचे आणि शिक्षकांचे मार्गदर्शन , महापुरूषांची पुस्तके आणि त्यांचे लिखाण यांचा प्रभाव असु शकतो. माझे लिखाण कदाचित अनेक लेखक आणि माझ्या आजुबाजुच्या विवेकी बुद्धीजनांमुळे प्रेरित असु शकते. या मांडणी व लेखण प्रक्रियेत कोणाला श्रेय देण्याचे राहुन गेले असल्यास मला अथवा आमच्या टीमला जरूर सांगावे. व्याकरणातील चुका दिसल्या तर सांगाव्यात आम्ही त्या निश्चित ठीक करू. या खटाटोपातुन वाचकाला तसूभरही मदत झाल्यास मला मोठा आनंद होईल.

 :- रूपेश रा शुक्ल

संस्थापक माय काउंसलर

**संपादन आणि प्रकाशन - ' टिम रुपेश रा शुक्ल '

Comments